Kani Mahila Manch

About us

कनि- महिला मंच

संस्थापिका : सौ. कल्याणी उल्हास कदम

एक स्त्री म्हणून जगताना तिच्या जगण्यातल्या वेदना, दैनंदिन कामकाजात अपुर्ण राहिलेल्या तिच्या सुप्त इच्छा, आकांक्षा कायमच जाणल्या आहेत. जाणलेल्या गोष्टींत कोणतीही उणीव न ठेवता स्त्रीच्या असलेल्या अस्तित्त्वाला आणखीन चार चाँद कसे लावता येतील याचा कायमच चौफेर दृष्टिकोनांतून विचार करत गेले. तिच्यात उपजत असलेल्या कलागुणांना व्यासंग देतांना व्यासपीठाची निर्मिती केली आणि उदयास आले ते म्हणजे “कनि महिला मंच.”

जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला “कनि” ची मुहूर्तमेढ रोवली गेली. २०२१ ते २०२२ च्या काळात म्हणजेच वर्षभरांत “कनि” मध्ये समाविष्ट असलेल्या महिला सभासदांसाठी प्रत्येक महिन्यांत एक किंवा दोन असे वेगवेगळ्या विषयांवर उपक्रम राबवत गेले. सुरुवात केली तेव्हा त्याच स्वरुप आणखीन विस्तारेल हा कणभर देखील विचार केला नाही कारण, “कनि” च्या स्थापनेआधी वेगवेगळ्या स्थरांतून म्हणजेच २००५ पासून स्त्रियांसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळीवर यशस्वीपणे उपक्रम राबवत आले आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी, गरजूला कपडे, अन्नधान्य वाटप ही मदतसेवा कायमस्वरुपी सुरुच असायची. अन्नधान्य वाटप ही मदतसेवा कायमस्वरुपी सुरुच असायची.

गरजूंसाठी तठस्थपणे उभे राहून कार्य करण्याची जिद्द माझे आई वडिल, आणि पती श्री. उल्हास कदम यांच्या आचरणातून मिळालेली ही शिकवण कायमचं उराशी बाळगून आहे. हाच ध्यास मनात ठेऊन कार्य करत असतांना आजवर कित्येक देवदासींच्या मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा आणि जगवण्यासाठीचा सर्वतोपरी प्रयत्न करित असते. शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या या आपल्या पुणे शहरांत मुलींच्या राहण्याची सुव्यवस्था व्हावी या विचारांतून गेली अनेक वर्षे मुलींसाठी हॉस्टेल यशस्वीपणे चालवत आहे.

स्त्री आपल्या संसाराची चौकट जशी चाणाक्ष पद्धतीने सांभाळू शकते अगदी तशाच पद्धतीने तीने विचार केला तर ती समाजासाठी आणि देश उभारणीसाठी देखील नक्कीच यशस्वी होऊ शकते. हाच सुप्त विचार करून “कनि” ची सुरुवात केली होती.
“कनि” चा आरंभ माझ्या जन्मभुमीत म्हणजेच पुणे शहरांत २०२१ मध्ये सुरु केला होता. कोरोनाचा काळ नुकताच सरला होता आणि जगण्यातला आकस दुर करण्याचे कार्य या काळातच “कनि” च्या माध्यमांतून वेगवेगळ्या टप्प्यांवर करत केले. सांस्कृतिक राजधानी म्हणून संबोधले जाणाऱ्या शहरांचा वारसाही या व्यासपीठाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवंत यशस्वीपणे पुर्ण केले आहेत.

“कनि” ची सुरुवात झाली तेव्हा कनिची सभासद संख्या २०० इतकी होती. आज ती संख्या पुण्यातही विशेष आहेच पण सोलापूर जिल्ह्यांत विशेष लक्षणीय म्हणजे १०,००० चा आकडा पार करुन आहे.
आज “कनि” चे कार्य पुणे यांसह सोलापूर, धुळे आणि नाशिक शहरांत यशस्वीपणे सुरु आहे. या प्रत्येक शहरांतल्या महिलांचा भरघोस प्रतिसाद, प्रेम आणि “कनि” प्रती असलेली आस्था आणि विश्वासार्हातामुळे हा प्रवास विस्तारत आहे. यानंतरही “कनि” चं बीज आपल्या संपुर्ण महाराष्ट्रांत यशस्वीपणे रुजवण्याचे ध्येय आहे. आणि “कनि” ते ध्येय नक्कीच गाठेल – साकारेल हे मी नक्कीच सांगू इच्छिते.

“कनि” च्या माध्यमांतून कोरोनाच्या काळांतल संकंट सुरु असतांना कोकणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त भागांत जीवनावश्यक वस्तुंसोबत अगदी गॅस – शेगडीची मदत कार्य, त्याच काळांत लावणी कलाकारांची जेवणाची झालेली आबाळ पाहता अन्नधान्य वाटप, लालबत्ती परिसरांत अतिशय आनंदाने हळदी- कुंकू समारंभ, अग्निशामक दलाच्या सर्व सेवक आणि ऑफिसर्ससोबत रक्षाबंधन, यासह मराठी – हिंदी चित्रपट आणि टिव्ही कलाकारांच्या उपस्थितीत अनेक मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी, अनेक ऑनलाईन – ऑफलाईन स्पर्धा, पुरस्कार सोहळे, वारीच्या काळांत पुस्तक दिंडी, नवरात्रीच्या काळांत दांडीया गरबा, प्रत्येक सहा महिनांच्या अंतरावर सहल यासारखे अनेक यशस्वी उपक्रम या “कनि महिला मंच” च्या माध्यमांतून २०२१ पासून आजमितीस यशस्वीपणे राबवले आहेत.
या मंचाच्या माध्यमांतून उभारलेला निधी पाहता १० निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. बरोबरीने गरजू महिलांना शिक्षण आणि रोजगाराची सुविधा उपलब्ध करून देणे यासारंखे अनेक संकल्प आणि माझ्या महिला – भगिनींच्या चेहऱ्यावर केवळ निखळ आनंद पाहण्यासाठीचा हा कनिच्या माध्यमांतून सुरु झालेला माझा प्रवास यानंतरही अविरतपणे सुरु असेल.
या प्रवासाच्या निमित्ताने सर्व वरिष्ठ, ज्येष्ठ आणि त्या त्या प्रवाहांत पारंगत असलेल्यांचे मार्गदर्शन, शुभाशिर्वाद कमावत आहे याचा मनस्वी आनंद नक्कीच आहे..!!

आजवरच्या कामाचा संक्षिप्त तपशील

व्यक्तीगत माहिती - सौ. कल्याणी उल्हास कदम

Scroll to Top